
जो स्वप्न देखते बाबर के, अरमान मिटाकर मानेंगे!
घोषणा आणि गीतांनी संकल्प केला दृढ
सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आपल्या जन्मभूमीवर उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होत आहेत. संपूर्ण देशभर आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त ही विशेष लेखमाला.
| भाग 10 |
कारसेवा करण्यासाठी पोहचण्याचा एकच निर्धार होता. विविध प्रांतांमधून अयोध्येकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन कारसेवकांनी तुडुंब होत्या. 31 ऑक्टोबर 1990 या दिवशी कारसेवा करायची होती. 15 ऑक्टोबर पासूनच कारसेवक अयोध्येकडे निघाले होते. आपण सहज अयोध्येला पोहचू शकणार नाही, याची पुरेपूर कल्पना आलेली होती.
आम्ही अमरावती जिल्ह्यातील कारसेवक ज्या ट्रेनने चाललो होतो, त्या ट्रेनला माणिकपूर रेल्वे स्थानकावरच थांबवून सर्वांना अटक करण्यात आली. शेकडो कारसेवक होते. त्या मानाने पोलिसांची संख्या तुटपुंजी होती. बहुतांश कारसेवकांनी पोलिसांना चकमा दिला आणि आम्ही माणिकपूरहून पायी नयनी गाठले. येथून सर्वांची फाटाफूट झाली. ज्या समूहाला जो रस्ता मिळेल तसे अयोध्येला पोहचायचे हा सर्वांचा प्रयत्न होता. अनेकांना कारागृहात डांबण्यात आले. आज 34 वर्षांनंतरही हा सर्व घटनाक्रम आजही डोळ्यासमोर ताजा आहे. नयनी पासून गंगा यमुना सरस्वती हा त्रिवेणी संगम नदीतून पार केल्यानंतर झुंसी पासून अयोध्येपर्यंतचा प्रवास पायीच होता. मोठी शहरे चुकवत शेताच्या काठाकाठांनी लहान खेड्यातील लोकांनी शिजवलेल्या खिचडीचा, मुरमुरे आणि गुळाचा आस्वाद घेत पायी चालायचे. रात्री जमिनीवर अंथरलेल्या तनसाच्या शय्येवर काही क्षणात डोळा लागायचा. माझे हे अनुभव आत्मप्रौढीसाठी नाही तर 30 ऑक्टोबर 1990 च्या कारसेवेला जे जे गेले त्या सर्वांचे तसेच अनुभव आहेत. ते प्रातिनीधिक स्वरूपाचे म्हणून लिहितो आहे. अनेकांचा तर पोलिसांनी अनन्वित छळ केला. गावोगावचे लोक रामभक्तांच्या जतथ्यांना पुढचा प्रवास सांगायचे. पुढच्या गावात पोहचले की तिथे पुढचा मार्ग सांगितला जाईल, एवढेच लोक सांगायचे. अयोध्या कितनी दूर है, या प्रश्नाचे उत्तर ठराविक साचेबंद मिळत होते. जणू काही ते लोक प्रशिक्षित केले होते. बस थोडा चले की पहुंच गये अयोध्याजी ! हे ‘थोडा चले’ म्हणजे किती किलोमीटर चालायचे हे उत्तर मिळत नव्हते. कारण, कोणीही रामभक्त जास्त अंतरामुळे रामकार्यापासून मागे फिरू नये, ही त्या गावकऱ्यांची भावना होती. झुंसी, सराय इनायत, प्रतापगढ, तिवारीपूर, दर्शन नगर असा तो प्रवास आणि सर्व टप्पे आठवले की ते खरोखरच रामकार्य होते, याची आज प्रचिती येते. आपोआप टोळी तयार व्हायची आणि ती पुढे सरकत राहायची. ते दिवस आठवले की बडनेराचे स्व. भास्करराव पवार, स्व. सुधीर घिमे, अनंत जोशी, अनंत पांडे, मनीष भट, जगदीश धुमाळे, राजू वाऊ, राजू बानाईत, अविनाश पातूरकर, अमरावतीच्या भाजीबाजार परिसरातील राजा खारकर, संजय महाजन, राजेंद्र महाजन ज्याला मिठ्ठू म्हणून ओळखायचे, मनोज पवार, शाम सावरकर आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे तेव्हाचे दोन विद्यार्थी डॉ. अतुल सरोदे आणि डॉ भालेराव यांच्या नावांचे स्मरण झाल्या विना राहवत नाही.
या खडतर प्रवासात साथ होती गीतांची आणि घोषणांची. रामजी की सेना चली या रामायण मालिकेतील रवींद्र जैन यांनी गायलेल्या गीताच्या सांघिक गायनाने संकल्प दृढ व्हायचा. थकवा दूर व्हायचा.
निश्चर हीन करेंगे धरती यह प्रण है श्री राम का
जब तक काम न पूरण होगा नाम नही विश्राम का
उसे मिटानें चलें की जिसका मंत्र वयम रक्षाम का
समय आ गया निकट राम और रावणके संग्राम का
या ओळींनी बाहू पुन्हा स्फुरायला लागायचे.
कोटि-कोटि हिन्दू जन का, हम ज्वार उठाकर मानेंगे।
सौगंध राम की खाते है, हम मंदिर भव्य बनायेंगे ॥
जन-जन के मन मे राम रमे, हर प्राण-प्राण में सीता है।
कंकर-कंकर शंकर इसका, हर श्वास-श्वास में गीता है।
जीवन की धडकन रामायण, पग-पग पर पडी पुनीता है।
यदि राम नहीं श्वासों में, तो प्राणों का घट रीता है।
नर-नाहर श्री पुरुषोत्तम का, शुभ मंदिर भव्य बनायेंगे ॥
जो नीति अपावन शासन की, वह नीति तोडकर मानेंगे।
जो सत्तामद में भरा हुआ, वह कुम्भ फोडकर मानेंगे।
जो फैल रही है आंगन में, विषबेल कुचलकर मानेंगे।
जो स्वप्न देखते बाबर के, अरमान मिटाकर मानेंगे।
कितना पशुबल है दानव में, हम उसे तौलकर मानेंगे ॥
हे गीत आंदोलनाचे प्रेरणा स्तोत्र बनले होते. कारसेवकांच्या, रामभक्तांच्या दृढनिश्चयाने हे गीत म्हणजे अयोध्या आंदोलनाचा मंत्र ठरले होते. संपूर्ण आंदोलनात आणि कारसेवेच्या पायी प्रवासात वीर शिवा राणा प्रताप ने फिर तुमको ललकारा है – कहो गर्व से हम हिन्दू हैं हिंदुस्तान हमारा है, बच्चा-बच्चा राम का जन्मभूमि के काम का, रण चंडी को नर मुण्डो की माला हम पहनाएंगे – राम लला हम आए हैं मंदिर भव्य बनाएंगे, सौगन्ध राम की खाते है – हम मंदिर भव्य बनांएगे, जिस हिन्दू का खून न खौले खून नही वह पानी है – जो राम के काम न आए वह बेकार जवानी है, जो नही राम के काम का – वो नही हमारे काम का, एक धक्का और दो – बाबरी मस्जिद तोड़ दो, या आवेशपूर्ण घोषणांचे योगदान प्रचंड बळ देणारे होते.
श्रीरामजन्मभूमी आंदोलनादरम्यान असंख्य लोकांनी फोनवर बोलताना ‘हॅलो’ ऐवजी ‘जय श्री राम’ म्हणण्याचा संकल्प केला होता. 34 वर्षांपासून काही जण आजही त्या संकल्पाचे पालन करताना आपल्याला दिसतात. हे सर्व अतर्क्य होते. अचाट होते आणि हे रामानेच घडवून आणले होते, असेच आज मागे वळून पाहताना म्हणावेसे वाटते.
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
9881717827
ayodhya ram mandir inauguration
- the temple0
- ram temple ceremony
- temple trust