सांस्कृतीक कार्य विभागाच्या वतीने आयोजित खडीगंमत महोत्सवाचे थाटात उद्घाटन

0

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित खडीगमत महोत्सवाचे आज दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी साय. ६:३० वाजता बाबडे सभागृह येथे प्रमुख मान्यवर ,शाहिर कलावंत व रसिक प्रेक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडले.

 


आज पहिल्या दिवशी शाहीर ज्ञानेश्वर वाघमारे आणि संच यांनी ग्रामस्वच्छता अभियान या विषयावर उत्कृष्ट कार्यक्रम सादर केले व उपस्थित त्याचे मने जिंकले आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजनातून समाज प्रबोधन केले. तसेच शाहिरा संगीता बनसोड यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर उत्कृष्ट कार्यक्रम सादर करून रसिकांची दाद मिळवली व बेटी बचाव बेटी पढाव याचे महत्त्व आपल्या गीतातून आणि वाणीतून जनतेला पटवून देऊन प्रबोधित केले. याप्रसंगी फार मोठे प्रेक्षक उपस्थित होते उपस्थित प्रेक्षकांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन ककलावंतांना प्रोत्साहित केले सांस्कृतिक कार्य संचालनायतर्फे सहाय्यक संचालक संदीप शेंडे साहेब, यांच्या हस्ते शाहीर कलावंत चा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुलदीप कोवे , खडसे हे प्रामुख्याने उपस्थित राहून कलावंताचे, रसिक प्रेक्षक, व सर्वांचे आभार व्यक्त केले.