किरिन रिजिजूंकडील कायदेमंत्री पदावरून हटवले, मेघवालांकडे जबाबदारी

0

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडील कायदेमंत्री पदाची जबाबदारी काढून ती अर्जून मेघवाल यांच्याकडे सोपविण्यात (Law Minister Kiren Rijiju) आली आहे. तर रिजिजू यांच्याकडे आता पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. किरेन रिजिजू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजियम सिस्टमवर केलेल्या वक्तव्यांमुळे ते चर्चेत राहिले. रिजिजू यांची अनेक वक्तव्य वादग्रस्तही ठरली होती. त्यामुळे केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायलयात तणाव निर्माण झाल्याचे चित्र तयार झाले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदीर यांनी त्यांचे खाते बदलण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

रिजिजू यांनी जुलै २०२१ मध्ये रवीशंकर प्रसाद यांच्याकडून केंद्रीय कायदेमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली होती. सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियम पद्धतीवर त्यांनी टीका केली होती. ही पद्धत भारतीय राज्यघटनेत एलियन सारखी आहे. सरकारकडे फाईल प्रलंबित आहे, असे म्हणू नका. सरकारकडे फाईल पाठवूच नका. तुम्ही स्वत:च स्वत:ची नेमणूक करा. भारतीय संविधान आणि जनतेने न्यायाधीशांना अधिकार दिले आहेत. जर केवळ न्यायाधीशांनीच निर्णय घ्यायचे असतील, तर मग लोकांचा या निर्णयाला पाठिंबा असेल अशी अपेक्षा कशी काय ठेवली जाऊ शकते, असे वक्तव्य रिजिजू यांनी केले होते.