नागपूर
मुंबईच्या आयकर अधिकार्यांची हवाला आणि डब्बा व्यापार्यांवर सलग दुसर्या दिवशीही कारवाई सुरू होती. यावेळी अधिकार्यांनी २0 हून अधिकांवर कारवाई करीत त्यांची कार्यालये तसेच निवासस्थानांचीही तपासणी केली. या कारवाईत रोख रकमेसह आर्थिक व्यवहाराची संशयास्पद कागदपत्रे सापडल्याचेही बोलले जात आहे. पुढील काही दिवस ही कारवाई कायम असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, रवी अग्रवाल, शैलेश लखोटिया, पारस जैन, लाला जैन, करण थावरानी, प्यारे खान, गोपी मालू, अक्षद लुणावत, हेमंत तन्ना, इजराईल सेठ आणि सीए रवी वानखेडे अशा अकरा जणांवर छापेमार कारवाई झाली आहे. या कारवाईत डब्बा व्यावसायिक रवी अग्रवाल याच्यासोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे अधिकार्यांनी नागपूरच्या अधिकार्यांना सहभागी करून घेण्यास टाळले. त्यामुळे नागपूरच्या आयकर अधिकार्यांवरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नागपूरच्या अनेक अधिकार्यांनी त्याच्या छत्तरपूर फॉर्मचा अर्थपूर्ण दौरा केल्याचेही सांगण्यात येत आहे. यात अनेक अधिकार्यांची नावेदेखील पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याच्या एफबीएफसीचा पत्ता मुंबई आहे, तर त्याने कंपनीची कामे कोलकाता येथून होत असल्याचे नमूद केले आहे.
यातील रवी अग्रवाल याची कोलकात्यात नॉन फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) असून या शेल कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला मिळाली आहे. रवी अग्रवाल हा ३ ते ४ टक्के दराने लोकांना फायनान्स करीत होता.