Home Breaking news Ladki Bahin Yojana :काय सांगता ! लाडक्या बहिणींना आणखी एक गिफ्ट ,...

Ladki Bahin Yojana :काय सांगता ! लाडक्या बहिणींना आणखी एक गिफ्ट , काय आहे ती योजना ?

0

Ladki Bahin Yojana : राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी जुलै २०२४ पासून लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली असून या योजनेद्वारे पात्र महिलांना १५०० रुपये दिले जात आहे. अशातच आता ‘लाडक्या बहिणीं’ना सरकार पुन्हा एक गिफ्ट देणार आहे. सरकारने लाडक्या बहिणींना भेट म्हणून साड्या देण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाकडून आता रेशन कार्डवर साडी मिळणार आहे. अंत्योदय रेशन कार्डधारक (Ration Card) असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एक साडी भेट दिली जाते. यंदाही लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप केले जाणार असून सर्व जिल्ह्यांना साडीचे वितरण सुरू झाले आहे.

कधी होईल साड्यांचे वाटप ?

रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्यातील अंत्योदय शिधा पत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. साधारण मार्च महिन्याच्या पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यात वितरण सुरू होऊ शकते.या साड्या फक्त अंत्योदय शिधापत्रिकांवर दिल्या जाणार आहेत. एका कार्डावर एक साडी याप्रमाणे साड्यांचे वाटप केले जाणार असून त्यासाठी होळीपर्यंतचा कालावधी दिला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्या साड्यांच्या दर्जा कसा असेल? याबाबत चर्चा होतेय.

▪️ लाडक्या बहिणींना सरकार पुन्हा एक गिफ्ट देणार असून शासनाकडून आता रेशन कार्डवर साडी मिळणार आहे. अंत्योदय रेशन कार्डधारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एक साडी भेट दिली जाते.

▪️ राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यासोबतच एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाही लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप केले जाणार असून सर्व जिल्ह्यांना साडीचे वितरण सुरू झाले आहे. एका कार्डावर एक साडी याप्रमाणे साड्यांचे वाटप केले जाणार आहे.

▪️ अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड म्हणजे गरीब कुटुंबाना अनुदानित अन्न मिळवून देण्यासाठी भारत सरकारची योजना आहे. या रेशन कार्डधारकांना दरमहा अन्नधान्य मिळते. रेशन दुकानावर अन्नधान्य याच्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्यातील अंत्योदय शिधा पत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे.

▪️ या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे. सरकारने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी म्हणजेच साधारण होळीपर्यंत हे साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा सणासुदीचा क्षण आनंदाचा आणि उत्साहाचा होणार आहे.