लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच 

0

 

अमरावती (Amravti)– खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) या भाजपकडून निवडणूक लढणार म्हणून युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे ठराव घेण्यात आला आणि तो ठराव मंजूर झाला.योग्य वेळी योग्य निर्णय कळवण्यात येईल.

लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच,कुणीही शंका घेऊ नये असे यावेळी खा नवनीत राणा यांनी संकेत दिले.अमरावतीच्या जनतेच्या आशीर्वादामुळे मी खासदार आहे . आम्ही एनडीएमध्ये आहोत. जी माहिती सेंट्रलवरून आली आणि आमची चर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली त्यानुसार आम्ही जो निर्णय घेऊ आमच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस नेहमी राहतील. सितारो को चमकने से कोई रोक नही सकता सितारा जहा पर भी रहे वो अपनी चमक जरूर छोडता है, एनडीएची बाजू मी ज्याप्रमाणे पार्लमेंट मध्ये ठेवली त्याची जाण नरेंद्र मोदी, अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांना आहे. आज माझ्या पक्षाने मला विश्वास दिला आहे की, कोणत्याही निर्णयासोबत ते माझ्या पाठीशी राहतील. दरम्यान, जे लोकं एनडीएच्या घटक पक्षाचं इमानदारीने पालन नाही करतील त्यांच्यावर नक्कीच एनडीएच्या माध्यमातून कारवाई करायला लावू, जे लोकं एनडीए सोबत आहे त्यांनी प्रामाणिक राहायला पाहिजे असे राणा यांनी स्पष्ट केले.