
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 10 मे रोजी सहल
नागपूर (NAGPUR), 7 मे
सीताबर्डी किल्ला सुरक्षा व इतर कारणास्तव नियमितपणे पर्यटकांना अद्याप प्रवेश नव्हता. नवीन पिढीला आपल्या नागपूर शहरातील वैभवशाली ऐतिहासाची माहिती व्हावी, या उद्देशाने मा. श्री. डॉ. अतुल पाटणे(भा.प्र.से.) प्रधान सचिव, पर्यटन, महाराष्ट्र राज्य व मा. मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, मुख्यालय प्रमुख, उत्तर महाराष्ट्र व गुजरात, भारतीय सशस्त्र सेना यांच्या संयुक्त पुढाकाराने सीताबर्डी किल्ला पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने, सीताबर्डी किल्ला सहलीचे आयोजन करण्यात येत असून मागील सहलीला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यातील दुसरा टप्पा शनिवार, 10 मे रोजी सकाळी 8.00 वाजता सीताबर्डी किल्ला येथून सुरू होईल. महामंडळाच्या प्रशिक्षित गाईड मार्फत किल्ल्याची माहिती देण्यात येणार असून लष्कराचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहे.
महामंडळामार्फत सीताबर्डी किल्ला सहल नियमितपणे प्रत्येक महिन्याचा दुस-या शनिवारी आयोजित केली जाणार असल्याचे मा. श्री मनोजकुमार सुर्यवंशी, भा.प्र.से. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांनी कळवले आहे. या सहलीचा जास्तीत जास्त पर्यटकांनी लाभ घ्यावा व अधिक माहितीकरिता समन्वय अधिकारी श्री सुनिल येताळकर, मो. क्र. 9021515519 व श्रीमती वैशाली भांडारकर मो. क्र.9503966877 व ई-मेल [email protected] यांच्याशी पर्यटकांनी सविस्तर माहितीकरीता संपर्क साधावा.