बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील अमडापुर येथील एका विवाहितेवर अत्याचार प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे प्रकरण २०१७ चे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमडापुर येथील एका महिलेवर ती घरी एकटी असताना शाम जुमडे व प्रताप कौसे या दोघांनी घरात बांधून तिच्यावर अत्याचार केले होते. यात पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी काल बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत दोन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
ही घटना घडल्यावर पीडितेचे नातेवाईक भाऊ व काका यांनी पीडितेची सुटका केली होती. यासंदर्भात 30 मे 2017 रोजी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम 341, 442, 366, 376 ड व 34 नुसार गुन्हा नोंदविला होता. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाच्या खटल्यात पिडीतेने घडलेली घटना न्यायालयासमोर सांगितली. मात्र, नंतर उलट तपासणीत आपला जबाब बदलवून घटना घडली नसल्याचे सांगितले होते. मात्र न्यायालयाने पीडितेच्या भावाचा व काकांचा जबाब ग्राह्य धरून हे प्रकरण बाहेर आपसात मिटविल्याची कबुली दिली होती. मात्र न्यायालयाने डॉक्टर व तपास अधिकारी व पीडितेने सुरुवातीला दिलेला 164 सीआरपीसीनुसार दिलेला जवाब ग्राह्य धरत न्यायालयाने दोघा आरोपींना आजन्म करावसाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एस. पी. हिवाळे यांनी सक्षमपणे व प्रभावीपणे युक्तिवाद करून सरकार पक्षाची कायदेशीर बाजू मांडली.