बंगळुरु: बुटीबोरी परिसरात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार, अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. बुटीबोरी नगर परिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी लावलेले बॅनर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत (Fadnavis Future CM) आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी कोणी बॅनर लावले असतील, त्यांनी ते काढून टाकावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. काही अतिउत्साही लोक असे करतात, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. 2024 मध्ये तेच मुख्यमंत्री राहतील व त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण विविध कारणांनी चांगलेच ढवळून निघाले आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लवकरच येणार आणि राज्यातील शिंदे-भाजप सरकार कोसळणार असल्याचे दावे विरोधकांकडून सुरु आहेत. तर काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री बदलणार असल्याचे दावे सुरु केले आहेत. अजित पवार हे भाजपसोबत जातील आणि मुख्यमंत्री होतील, अशा चर्चाही सुरू आहे.
“फडणवीस भावी मुख्यमंत्री”, बुटीबोरी परिसरात लागले बॅनर
Artical Blog
Artical Blog
Artical Blog














