महाराष्ट्रात होणार विजांचा कडकडाट; मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज

0
Rain
Rain

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलले असून, दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढग जमा होऊन पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाच्या शिडकाव्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, आता हवामान विभागाने पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील काही भागांत वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली असून, काही भागांत उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. दुसरीकडे, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत रविवारी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाजही वर्तविला आहे.

अबकी बार 400 पार अशक्य
छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने खळबळ

अबकी बार 400 पार अशक्य आहे. उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी लोकांमध्ये सहानभूती आहे, असे खळबळजनक विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच एनडीएचा मार्गही यंदा फार कठीण असून बारामतीमध्ये होणारी लढत दुर्दैवी असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. एका मुलाखतीत छगन भुजबळ बोलत होते. भाजपचा मार्ग आता सहज सोपा राहिलेला नाही. असेही ते म्हणाले.

RSS आरक्षणाच्या बाजूने
सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

संघाने काही विशिष्ट वर्गांना दिलेल्या आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. काही लोक खोटे पसरवत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत रविवारी केले. हैदराबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, जोपर्यंत आरक्षणाची गरज आहे तोपर्यंत आरक्षण सुरूच राहावे, असे संघाचे मत आहे. आरक्षणाबाबत भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वक्तव्यानंतर भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शिवसेनेने स्वतःचे हिंदुत्व गमावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला निशाणा
काँग्रेसने नेहमीच राम मंदिराला विरोध केला आहे. त्यात आता शिवसेना त्यांच्यासोबतच जाऊन स्वतःचे हिंदुत्व गमावून बसली आहे. आज जर बाळासाहेब असते तर त्यांना खूप वाईट वाटले असते. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महायुतीचे हातकणंगलेतील उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरातील उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची सभा पार पडली. यावेळी मोदींनी नेहमीप्रमाणं मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा आपल्याला सत्तेत बसवण्याचं आवाहन केलं. या सभेसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी हजेरी लावली. मोदींच्या भाषणाला सुरुवात होण्यापूर्वी भिडे हे प्रेक्षकांमध्ये पुढच्या रांगेत बसले. या ठिकाणी बसून त्यांनी मोदींचं संपूर्ण भाषण ऐकलं. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावली.

आपच्या प्रचार गीतावर निवडणूक आयोगाचा आक्षेप
– हुकूमशाही शब्द वापरल्याने आक्षेप
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या (आप) प्रचार गीतावर (थीम साँग) निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदवला आहे. यावरून दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आप नेत्या आतिशी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे. आपच्या संपूर्ण गाण्यामध्ये भाजपाचे नाव नाही, पण तुम्ही हुकूमशाही शब्द वापरत असाल तर तुम्ही सरकारला लक्ष्य करत आहात, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

गुप्त मतदान प्रक्रियेचे जाहीर लाईव्ह प्रदर्शन
ते मतदार पोलिसांसह निवडणूक विभागाच्या रडारवर

मरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. दरम्यान काही उत्साही मतदारांनी निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर बसवून या गुप्त मतदान प्रक्रियेचे जाहीर लाईव्ह प्रदर्शन केले. यामुळे गुप्त मतदान प्रकियेचे उल्लंघन झाल्याने या गुप्त मतदानाचे लाइव्ह प्रदर्शन करणारे ‘ते’ मतदार पोलिसांसह निवडणूक विभागाच्या रडारवर आले आहेत. निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार त्यासर्व संबंधीत (गुप्त मतदान प्रकियेच्या गोपनीयतेचा भंग करणारे) मतदारांवर कारवाई प्रस्तावित असल्याचे पोलीस आयुक्तालयातील सायबर सेल अधिकारी अनिकेत कासार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आदर्श आचारसंहिता कशाला सोशल माध्यमांवरील माहितीही पुरविण्यात येत असल्याचेही यावेळी कासार यांनी सांगितले.

 

भारतात आणखी बँकांची होणार वाढ

RBI ने मागवले अर्ज, नागरिकांना होणार फायदा
देशाला लवकरच आणखी नव्या काही बँका मिळू शकतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अनेक लघु वित्त बँकांकडून या संदर्भात अर्ज मागवलेत. जर कोणतीही समस्या आढळली नाही तर त्यांना आरबीआयद्वारे नियमित किंवा सार्वत्रिक बँकांचा दर्जा दिला जाऊ शकतो. सध्या देशात सुमारे डझनभर लघु वित्त बँका आहेत. यामध्ये एयू स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यासह सुमारे डझनभर लघुवित्त बँकांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2014 मध्ये खाजगी क्षेत्रातील लघु वित्त बँकांच्या परवान्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र, तत्कालीन लघुवित्त बँकांचा व्यवसाय पसारा वाढत असल्याने रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे.