मुंबई: अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला आहे
महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षात तिसऱ्यांदा भूकंप
राज्यात अशा स्वरुपाचा राजकीय भूकंप होण्याची ही तिसरी वेळ आहे. 2019 मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत पहाटे शपथ घेतली होती. त्यानंतर बहुमत सिद्ध न करता आल्याने अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री बनले होते. हे सरकार कार्यरत असतानाच शिवसेनेत बंड झालं आणि महाराष्ट्रात दुसरा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी 2022 मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेला वर्ष पूर्ण होत नाही, तोच आता अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत भूकंप घडवला आहे.