पेरणीला एक महिना उशीर, तुरळक पावसावर शेतकऱ्यांची पेरणी

0

 

बुलढाणा- कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ७० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आव्हान शेतकऱ्यांना केले असताना सुद्धा जिल्ह्यामध्ये एक महिना झाला तरी समाधानकारक असा पेरणीसाठी पाऊस पडलेला नाही. तरी शेतकऱ्यांनी एक महिना वाट पाहून तुरळक झालेल्या पावसावर आज पेरणीला सुरुवात केली आहे. यावर काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता शेतकरी म्हणाले की एक महिना अगोदरच उशीर झाला आहे, पुढील पेरणी ही यामुळे लांबविली गेली. चांगला पाऊस नसला तरी काय झाले पेरणी ही लागते. बाकी सर्व देवाच्या भरोशावर आहे अशा पद्धतीने आम्ही पेरणी करत असतो अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिली.