समृद्धी अपघात, मृत्यूमुखी पडलेल्या 24 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार

0

 

बुलढाणा- बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा येथील समृद्धी महामार्गावर खासगी लक्झरी बस रस्त्यालगतच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्स मधील 25 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला . हे सर्व मृतदेह बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान या सर्व मृतदेहांवर बुलढाणा येथेच सामूहिक रित्या अंत्यसंस्कार निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज रविवारी बुलढाणा येथील हिंदू स्मशानभूमी मध्ये सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून एकाच वेळी 24 मृतदेहांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंतयात्रेमध्ये मृतकांचे नातेवाईक सहभागी झाले होते. अंत्ययात्रेमध्ये राज्याचे वैद्यकीय उच्च शिक्षण तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार प्रतापराव जाधव, खा. रामदास तडस, आ. संजय गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आदी लोकप्रतिनिधी,हजारो बुलढाणेकर नागरिक या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.