
नागपूर(Nagpur), दि. 12 मे 2026: शहरातील वीज यंत्रणा अधिक सक्षम, सुरक्षित आणि अखंडित ठेवण्यासाठी महावितरणतर्फे नियमित देखभाल व दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अत्यावश्यक तांत्रिक कामांमुळे बुधवार 13 मे 2026 रोजी शहरातील काही भागांतील वीजपुरवठा सकाळी काही तासांसाठी नियोजित स्वरूपात बंद राहणार आहे.
ही कामे प्रामुख्याने सकाळी लवकर पूर्ण करण्याचे नियोजन असून, नागरिकांना होणारी गैरसोय कमी करण्यावर महावितरणचा भर आहे. या कामांमुळे कॉग्रेसनगर विभागात सकाळी 7 ते 11 या वेळेत शंकरनगर, बजाजनगर, एनआयटी इमारत, गिरीपेठ, गोरेपेठ, धरमपेठ, कर्वे नगर, उज्वल नगर, पावनभूमी, पर्यावरण नगर, श्रीराम नगर, कॉस्मोपॉलिटन, नेल्को सोसायटी, सुमित नगर, अध्यापक लेआउट, आझाद हिंद नगर, टाकळी सिम पाण्याची टाकी, आदिवासी लेआउट, एलआयजी – एमआयजी कॉलनी, सुर्वे नगर, संघर्ष नगर, जयताळा, झाडे लेआउट, प्रधान नगर, शिवप्रिया व रमाबाई अपार्टमेंट, आंबेडकर लेआउट, कबीर नगर, एकात्मता नगर, डोंगरे लेआउट, अभिजीत सोसायटी, पूजा लेआउट, दादाजी नगर, वानखेडे लेआउट, राही कॉलनी आणि ऑर्बिटल एम्पायर या भागातील तर सकाळी 8 ते 10:30 या वेळेत दगडी पार्क, बास्केटबॉल मैदान, नवीन रामदासपेठ, आनंद टॉकीज, कुंभारटोली, धनश्री अपार्टमेंट, प्लॅटिना हॉस्पिटल याशिवाय सकाळी 8 ते 11 या वेळेत खामला जुनी बस्ती, सिंधी कॉलनी, मिलिंद नगर, प्रताप नगर, रेल्वे कॉलनी, व्यंकटेश नगर, कोतवाल नगर, शांती निकेतन आणि शिव नगर आणि सकाळी 9 ते 10 यी वेळेत लक्ष्मी नगर भागातील वीज पुरवठा बंद राहील.
सिव्हील लाईन्स विभागात सकाळी 8 ते 11 यी वेळेत: नवीन व जुने मानकापूर, फरस चौक, धनेश्वर सोसायटी, वेलकम सोसायटी, कोराडी रोड परिसर. गांधीबाग विभागात सकाळी 7 ते 11 या वेळेत लाल ईमली चौक, गोळीबार चौक, गांजाखेत, खदान, छोटी खदान, नांदबाजी डोब आणि देवघर मोहल्ला, महाल विभागात सकाळी 8 ते 9 या वेळेत ईश्वर नगर, सहकार नगर, विजयालक्ष्मी पंडित नगर आणि हसनबाग चौक या भागात तर बुटीबोरी विभागात सकाळी 7 ते 11 या वेळेत विको अल्फा, निलडोह आणि अप्रेल पार्क उपकेंद्रांतर्गत येणारा ‘ए’ झोन फेज २ मधील परिसरातील वीज पुरवठा बंद राहील.
येत्या पावसाळ्यात अखंडित आणि दर्जेदार वीज सेवा मिळावी, यासाठी ही मान्सुनपुर्व दुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे. या नियोजित कामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर

















