
(Yawatmal)यवतमाळ – मराठा समाजाचे नेते,आंदोलक (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला, त्यांना प्रचंड प्रतिसाद मराठा बांधवांनी दिला. एक प्रकारे ही लढाई त्यांनी जिंकली, परंतु तहामध्ये मात्र ते हरले, असे चित्र उभे ठाकले आहे.
अशी टिप्पणी (Former MP Haribhau Rathod)माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केली आहे. सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर, भूकंपाचे धक्के दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की, काही झालं तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही.
आता मात्र मराठा समाजाला सगे-सोयाऱ्यांच्या कुणबी दाखल्याप्रमाणे किंवा कुणबी नोंदी प्रमाणे दाखले दिल्यास ओबीसीवर हा प्रचंड अन्याय होणार आहे, दिवसाढवळ्या आरक्षण ओढून घेण्याचा हा प्रकार यासाठी ओबीसी नेते जबाबदार आहेत, अशी प्रतिक्रिया हरीभाऊ राठोड यांनी दिली आहे.