वर्धा : येथील वर्दळीच्या परिसरातील मुख्य प्रशासकीय भवनात असलेल्या आरटीओ कार्यालयास अचानक आग लागली. सध्या अग्निशमन विभागाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे.
भवनातील पहिल्या माळ्यावर हे कार्यालय आहे. आज सुट्टीचा दिवस असल्याने परिसरात वर्दळ नव्हती. कार्यालये बंद होती. सायंकाळी सहा वाजता कार्यालयातून धूर बाहेर पडत असल्याचे काहींना दिसून आले. मात्र लगेच आगीचा लोट उसळला. त्यात कागदपत्रे जळाल्याची शक्यता आहे. ही आग लगतच असलेल्या अन्य कार्यालयात पोहचू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहे. आणखी दोन गाड्या बोलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
रविवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे आरटीओ कार्यालय बंदच होते. आग कशाप्रकारे लागली याची माहिती कळू शकली नसली तरी शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आरटीओ कार्यलयाच्या एका रूमला आग लागल्याने शासकीय दस्तावेज जळल्याचे समजते. आग आटोक्यात आणण्यासाठी वरच्या मजल्यावर निशाणी लावून आगीवर नियंत्रण ठेवण्यात येत होते. आजूबाजूच्या कार्यालयात मात्र आग पसरली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आगीत नेमके किती नुकसान झाले, याचा अंदाज घेण्याचे काम सुरु आहे