राजेंद्र शेषराव टाकळकर प्रदेश भाजपचे विशेष निमंत्रित सदस्यपदी

0

नागपूर- भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये राजेंद्र शेषराव टाकळकर, बुलडाणा यांची ‘विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच राजेंद्र टाकळकर यांची नियुक्ती केली आणि त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.राजेंद्र टाकळकर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. भाजपमध्येही त्यांनी विविध पदांवर यशस्वीरित्या काम केले आहे. या निमित्ताने त्यांना प्रदेश कार्यकारिणीवर काम करण्याची संधी मिळाल्याने पक्ष अधिक बळकट होणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वृध्दीकरिता या कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्य महत्वाचा असून आपल्या अनुभवाचा लाभ संघटनात्मक वाढीसाठी उपयुक्त ठरेल,असा विश्वास यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. प्रदेश भाजप विशेष निमंत्रित सदस्य राजेंद्र शेषराव टाकळकर यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.