नागपूर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Medical) लवकरच अद्ययावत रोबोटिक शल्यक्रिया उपकरण (robotic surgery machine ) सेवेत रुजू होणार आहे. हे शल्यक्रिया उपकरण अमेरिकेतून आयात करण्यात (import from America ) येणार असल्याचे शपथपत्र खरेदीचे अधिकार मिळालेल्या हाफकिन्सने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले. या उपकरणासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र कार्यादेश लागू न झाल्याने आजवर ते सेवेत येऊ शकले नसल्याची बाब मेडिकलने खंडपीठाला आपली बाजू मांडताना सांगितली. त्यामुऴे या उपकरणाच्या इन्टॉलेशनसाठी 12 आठवडे लागू शकतात. त्यानंतर ते रुग्ण सेवेत रुजू होईल, याकडेही मेडिकलने खंडपीठाचे लक्ष वेधले. हाफकिन्स संचालकीय व्यवस्थापकांनी सादर केलेल्या शपथपत्रात हे उपकरण अमेरिकेतून आयात होणार असल्याची माहिती खंडपीठाला सादर करण्यात आली. त्यावर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या खंडपीठाने हाफकिन्सला मुदत दिली.
खंडपीठाने 15 मार्चपर्यंत हे उपकरण मेडिकलच्या सेवेत रुजू करण्याचे आदेश यापूर्वी दिलेल्या सुनावणीत दिले होते. अॅड. अनुप गिल्डा यांनी न्यायालयीन मित्र म्हणून कामकाज पाहिले. तर हाफकिन्सच्या वतीने अॅड. एस. व्ही मनोहर आणि अॅड. के. एस. नरवाडे यांनी युक्तीवाद केला.
हाफकिन्सने खंडपीठाला सादर केलेल्या शपथपत्रात रोबोटिक शल्यक्रिया मशीनसाठी 23 फेब्रुवारी 2022 ला च वर्क ऑर्डर जारी झाल्याची माहिती दिली. निवेदेतील अटी व शर्थीनुसार अमेरिकेतून उपकरण मेडिकलमध्ये दाखल झाल्यानंतर 12 आठवड्यात इन्स्टॉलेशनची प्रक्रिया केली जाणार आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात फायर फाइटिंग उपकरणे न लावल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी खंडपीठाची बिनशर्त माफी मागितली. मेडिकल आणि मेयोतील औषधे व उपकरणांच्या खरेदीत दिरंगाई करणाऱ्या हाफकिन्सवर ताशेरे ओढत यापूर्वी खंडपीठाने हाफकिन्सचे प्रबंध संचालक अभिमन्यू काले यांना सुनावणीसाठी हजर होण्याचे आदेश दिले होते.