वर्धा शहरातील रस्त्यांच्या कामांची आमदार पंकज भोयर यांनी केली पाहणी

0

 

वर्धा -शहरातील रस्त्यांच्या कामांची आमदार पंकज भोयर यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी विविध अडचणी मांडल्या. रस्त्यांची कामे चांगल्या पध्दतीने करण्याच्या सूचना आमदार पंकज भोयर यांनी केल्या. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासह अधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती. भूमिगत गटार योजनेमुळे अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली. शासनाकडून रस्त्यांच्या कामासाठी २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नागरिकांना अडचणी येऊ नये, या अनुषंगाने कामाच्या यावेळी सूचना दिल्या.