नांदेड : (NANDED)शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ते लवकरच ठाकरे गटात जातील, असा पलटवार माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केलाय. (Congress leader Ashok Chavan) काल शिरसाट यांनी अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात जातील, असे विधान केले होते. त्याला अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. शिरसाट भविष्यकार आहेत का? खरे म्हणजे शिरसाटांच्या कोणत्याही वक्तव्याची फार दखल घ्यायची गरज मला वाटत नाही. त्यांना मंत्रिमंडळात प्रवेश मिळणार नाही, हे निश्चित झाले आहे. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही. त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्याशिवाय पर्याय नाही. ते लवकरच जातील, असे चव्हाण म्हणाले.
छत्रपती (sambhaji nagar)संभाजीनगर इथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. या सभेनंतर सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गोमूत्र शिंपपडून मैदानाचे शुद्धीकरण केले. त्यावर भाष्य करताना चव्हाण म्हणाले की, राजकारणात अतिशय खालच्या स्तर गाठला जात आहे. जे अत्यंत चुकीचे आहे. सभेचे ठिकाण हे सार्वजनिक ठिकाण असून, कुणालाही तिथे सभा घेता येतात. कुणालाही सभा घेण्यापासून रोखलेले नाही. तुमच्या झाल्यावर आम्ही तसे करायचे का? तुम्ही सभा घ्या, विचार मांडा पण, गोमूत्र शिंपडण्याचा प्रकार लोकांना आवडणारा नाही, असे चव्हाण म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला म्हणून आम्ही बदला घेतल्याचे विधान (BJP)भाजपचे प्रदेशाध्यक्ष (Chandrasekhar Bawankule)चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे, याकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले की, राजकारणात बदल्याची भाषा कुणी वापरू नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना काही नीतिमूल्ये असतात. तुम्ही जे केले ते समर्थनीय आहे का? असा माझा बावनकुळेंना सवाल आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.