नागपूर, – (nagpur)4 एप्रिल 2023 विवेकानंद केंद्र, नागपूरच्यावतीने येत्या, ७ ते ९ एप्रिल २०२३ दरम्यान दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय(‘Youth Inspiration Camp) ‘युवा प्रेरणा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. (Vivekananda Centre)विवेकानंद केंद्र, 26 अत्रे लेआऊट, प्रतापनगर येथे सकाळी 9.30 ते 11.30 दरम्यान होणा-या या शिबिरात विविध कार्यशाळा, संघबांधणी उपक्रमांच्या माध्यमातून शरीर स्वास्थ, संवाद कौशल्य, सृजनशिलता इत्यादी विकसित करण्यावर शिबिरात भर दिला जाणार आहे. नुकतीच दहावी, अकरावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या व नागपुरात वास्तव्यास असलेल्या (student)विद्यार्थी या शिबिरात भाग घेऊ शकतात. शिबिरात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी विवेकानंद केंद्र, 26 अत्रे लेआऊट, प्रतापनगर, नागपूर येथे किंवा हर्षिता अग्रवाल – 9599080855 व कीर्ती पुराणिक – 9822696937 यांच्याशी सकाळी 10.30 ते 12.30 आणि सायंकाळी 5.30 ते 7 दरम्यान संपर्क साधावा. नाव नोंदणीसाठी
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfxydwsAthHyv5PTh-NyIw31aW0wnopIdCgzp_Vt-8fQQf7NQ/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&usp=mail_form_link