कोंढाळीजवळ पेटली शिवशाही बस

0

नागपूर : नागपूरवरुन अमरावतीकडे १६ प्रवासी घेऊन जाणारी(shivshahi) शिवशाही नागपूर -अमरावती शिवशाही(bus) बस शॉर्ट सर्किटमुळे आग लागून पूर्णपणे जळाल्याची घटना नागपूर अमरावती महामार्गावर कोंढाळी नजीकच्या(sai baba temple) साईबाबा मंदिरजवळ आज घडली. सुदैवाने सर्व प्रवासी वेळेत बसखाली उतरल्याने सुखरूप राहिले आहेत. ही घटना मंगळवार ४ एप्रिल रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली. बस क्र 0788, असून गणेशपेठ आगाराची ही शिवशाही बस नागपूर -अमरावती (travel)प्रवासाला निघाली होती. एसटीच्या देखभाल दुरुस्तीकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने या प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोप यानिमित्ताने अनेकांनी केला.

 

 

भेलपुरी पापड कोन चाट आणि छोले चॅट रॅप | Bhelpuri Papad Cone Recipe|Chhole Chaat Stuffed Roll |EP-106