डास पळविण्याची कॉईल ठरली जिवघेणी, सहा जणांचा मृत्यू

0

 

 

 

नवी दिल्ली : डासांना पळवून लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॉईल किती जिवघेण्या ठरू शकतात, याचा प्रयत्न राजधानी दिल्लीत आलाय. दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात शुक्रवारी सकाळी एका घरात सहा जण मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृत्यू झोपेत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. डासांपासून बचाव करण्यासाठी रात्रभर जाळण्यात आलेल्या कॉईलमुळे उशीने पेट घेतला व आग लागून होरपळल्याने दोघे जण मृत्यूमुखी पडले. तर इतर लोक यामुळे घरात दाटलेल्या धुरामुळे गुदमरुन मरण पावल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे (Delhi Fire Incidence ). झोपेतच मृत्यूमुखी पडलेले हे लोक एकाच कुटुंबातील आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, एका घरातील अनेक सदस्य बेशुद्ध पडल्याची खबर मिळाली होती. आम्ही घटनास्थळी जाऊन सर्वच सदस्यांना रुग्णालयात पाठवले. तिथे डॉक्टरांनी 8 पैकी 6 सदस्यांना मृत घोषित केले. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला पाठवून तपास सुरू केला आहे. काल दिल्लीतील रात्री शास्त्री पार्कमध्ये एकाच कुटुंबातील लोक हे डास घालवणारे कॉइल पेटवून झोपले होते. त्यानंतर कॉइलमुळे उशीला आग लागली. आगीत भाजून दोघांचा मृत्यू झाला. तर 4 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलीस या प्रकरणाचा अनेक अंगाने तपास करीत असून यात कुठला घातपात तर नाही ना,हे देखील तपासल जात आहे.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा