Home Artical Blog एनएफएससी नागपूर आणि आयआयटी भुवनेश्वर यांच्यात सामंजस्य करार

एनएफएससी नागपूर आणि आयआयटी भुवनेश्वर यांच्यात सामंजस्य करार

0

नागपूर(Nagpur), 6 मे : केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी), नागपूर आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था भुवनेश्वर (आयआयटी भुवनेश्‍वर) यांच्यात शैक्षणिक, संशोधन आणि क्षमता विकास क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी 5 मे 2026 रोजी आयआयटी भुवनेश्वर येथे सामंजस्य करार करण्यात आला.
एनएफएससीचे संचालक प्रा. डॉ. ए. आर. सोनटक्के आणि आयआयटी भुवनेश्वरचे संचालक प्रा. श्रीपाद करमाळकर यांनी या सामंजस्‍य कराराची देवाणघेवाण केली. यावेळी स्‍कूल ऑफ मेकॅनिकला सायन्‍सेसचे प्रमुख प्रा. अरुण कुमार प्रधान, एसआरआयसीचे अधिष्‍ठाता प्रा. पी. दिनाकर, प्रा. मिहिर कुमार पंडित, डॉ. प्रसेंजीत रथ, डॉ. अमृत बी. साहू तसेच एनएफएससीचे श्री एन. अरविंदन यांची उपस्थिती होती.
या कराराअंतर्गत संयुक्त संशोधन प्रकल्प, प्राध्यापक व विद्यार्थी विनिमय कार्यक्रम, प्रयोगशाळा व संशोधन सुविधा सामायिक वापर, तसेच कार्यशाळा, परिषद, प्रशिक्षण कार्यक्रम आणि अल्पकालीन अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
गृह मंत्रालयाचे डीजी (एफएस, सीडी अँड एचजी) श्री सुनील कुमार झा यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार मंजूर करण्यात आला असून अग्निशमन अभियांत्रिकी व सुरक्षा क्षेत्रातील संशोधन आणि तांत्रिक क्षमता वाढीस यामुळे मोठी चालना मिळणार आहे, असे प्रा. डॉ. ए. आर. सोनटक्के यांनी सांगितले.