खासदार धानोरकर यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

0

(Chandrapur)चंद्रपूर : काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Congress MP Balu Dhanorkar)यांच्यावर बुधवारी (MP Suresh Dhanorkar Last Rites) अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात वणी-वरोरा बायपासवरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला होता. (Chandrapur Guardian Minister Sudhir Mungantiwar)चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह (Congress leader Balasaheb Thorat)काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (State President Nana Patole), प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक (Congress General Secretary Mukul Wasnik), माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यासह राज्यभरातील नेते व हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

खासदार धानोरकर यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी दिल्लीहून नागपूरमार्गे वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. बाळू धानोरकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. बुधवारी सकाळी राज्यभरातील नेतेही अंत्यसंस्कारासाठी वरोरा येथे दाखल झाले होते. त्यांच्या निवासस्थानाहून निघालेल्या अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. 26 मे रोजी बाळू धानोरकर यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. ते उपचाराला प्रतिसाद देत असतानाच त्यांची मंगळवारी पहाटे प्राणज्योत मालवली. दोन दिवसांआधीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते.