राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय ओबीसी शिबीर 3-4 जूनला,

0

शरद पवार येणार

(Nagpur)नागपूर : उठ ओबीसी जागा हो.. नव्या क्रांतीचा धागा हो.. हा जयघोष करीत येत्या 3 आणि 4 जूनला नागपुरात राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी खा शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजितदादा पवार, छगन भुजबळ आदी अनेक मान्यवर नेते नागपुरात येत आहेत. याविषयीची माहिती पत्रपरिषदेत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

3 जूनला दुपारी 2 वाजता नागपुरात आल्यानंतर 3 वाजता उद्घाटन समारंभात अजितदादा पवार (Ajit Pawar) उपस्थित असणार आहेत. 4 जून रोजी समारोपाला राष्ट्रवादीचे संस्थापक,अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)हे उपस्थित असणार आहेत. दोन दिवस सुमारे पाचशे ते सहाशे कार्यकर्ते या ओबीसी शिबिरात सहभाग घेणार असून राष्ट्रवादीचे राज्यभरातील ज्येष्ठ नेते या शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. या शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत व लेखक प्रा. हरी नरके(Prof. Hari Narke),आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari), ऍड अंजली साळवे (Ad. Anjali Salve), धनगर समाजाच्या युवा नेत्या सक्षणा सलगर,(Vikas Lawande)विकास लवांडे,(Avinash Kakade)अविनाश काकडे आदी अनेक मान्यवर ओबीसींच्या विविध विषयावर व सध्याच्या घडामोडींवर मार्गदर्शन करणार आहेत. पत्र परिषदेला माजी मंत्री (Ramesh Bang)रमेश बंग, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे(City President Duneshwar Pethe), ईश्वर बालबुधे (Ishwar Balbundhe), (Shekhar Sawarbandhe)शेखर सावरबांधे,जिल्हाध्यक्ष बाबा गुजर (District President Baba Gujar), नूतनताई रेवतकर (Nutantai Revatkar)  आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.