डोक्यात गोळी झाडून युवकाची कामठीत आत्महत्या

0

(Nagpur)नागपूर : (Kanhan) कन्हान येथील (Journalist Ajay Trivedi)पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या तरुण मुलाने डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजता घडली. मृतकाचे नाव आयुष अजय त्रिवेदी वय 26 वर्षे असे आहे. स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी टाऊनशीप परिसरात त्रिवेदी परिवार वास्तव्याला आहे.

घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनार्थ नागपूरच्या मेयो इस्पितळात पाठविला. आयुषच्या पार्थिवावर कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . मृतकाच्या पाठीमागे आई,वडील व एक बहीण असा आप्तपरिवार आहे. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.