खासदार प्रफुल्ल पटेल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0

नागपूर (Nagpur), १७ फेब्रुवारी २०२५ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर (NCP Nagpur)शहरतर्फे मा. श्री. खासदार प्रफुल्ल पटेल (MP Praful Patel)साहेब यांचा वाढदिवस पक्ष कार्यालय, गणेशपेठ येथे केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने शहर व ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये फळ वाटप, शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाला शहर अध्यक्ष प्रशांत पवार, ग्रामीण अध्यक्ष शिवराज बाबा गुजर, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, अनिल अहिरकर, सुनीता येरणे, तानाजी वनवे, रमण ठवकर, जानबा मस्के, रवी पराते, अरविंद भाजीपाले, अमरीश ढोरे, आशीष मदान, राहूल कांबळे, मॉन्टी गंडेचा, सुखदेव वंजारी, मुमताज बाजी, बाळबुधे गुरूजी, रेखा चरडे, एकनाथ फलके, सुशांत पाली, शोभा कोटेकर, यशश्री बंसोड, शहाजा बाजी, कनिजा बेगम, राजेंद्र भोयर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.