
विरोधकांनी फाडली अर्थसंकल्पाची प्रत
नागपूर NAGPUR फेब्रुवारी 2024 : नागपूर जिल्हा परिषदेच्या , शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. यावेळी अर्थसंकल्पाची प्रत फाडत साहित्याची तोडफोड करण्यात आली. यामुळे विरोधी पक्षनेते आतिश उमरे आणि सदस्य सुभाष गुजरकर यांना निलंबित करण्याचा ठराव एकमताने पारित करून विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला.
विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी टेबल आपटला, माईकची तोडफोड केली तसेच अर्थसंकल्पाची प्रत फाडीत गोंधळ घातला. अर्थसंकल्प चर्चेविना मंजूर करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद कार्यक्रमात गुन्हेगार कृत्यांवरून आमदारकी गमावलेले सुनील केदार यांचे छायाचित्रे का लावता असा आक्षेप विरोधकांनी घेतला. त्यावर उपाध्यक्ष कुंदा राऊत चांगल्याच संतप्त झाल्या. यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प हा 42 कोटी 69 लाखांचा आहे. राज्य शासनाने अनुदानाची रक्कम अद्याप दिली नसल्याने त्याचा परिणाम अर्थसंकल्पावर होणार आहे. चर्चेविना अर्थसंकल्प मंजूर करण्याचा आरोप करीत विरोधकांनी गोंधळ घातला.
प्रशासनाने अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून तयार सुरू केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौम्या शर्मा यांनी यासंदर्भात आढावा घेतला होता. विविध विभागांकडून करण्यात आलेल्या मागणीची माहिती त्यांनी घेतली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्प सादर करण्याची घाई होत होती. त्यामुळे ‘तिजोरी’ मधील रक्कम लक्षात घेता अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यापूर्वी 2023-24 आर्थिक वर्षांसाठी 40 कोटी 69 लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. वित्त विभागाला खर्चासाठी आवश्यक निधी हा सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात येते. परंतु आता वित्त विभागाला खर्चासाठी स्वतंत्र निधी हवा आहे. तशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यांच्या मागणीमुळे मोठा आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.