तुमचा पक्ष तुम्हाला हेच शिकवतो का? यशोमती ठाकूर संतापल्या

0

 

अमरावती  AMRAVATI -भाजप राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या डोक्यात फरक पडला आहे. डॉ. अनिल बोंडे त्यांचे सांस्कृतिक दर्शन करत आहेत. डॉ. अनिल बोंडे हे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहे की नाही हे कळायला मार्ग नाही. हे वाद करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात.पदोपदी तुम्ही महिलांचा अपमान करता तुमचा पक्ष तुम्हाला हेच शिकवतो का? असा संताप काँग्रेस आ यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

याआधी त्यांनी मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हटलं, आता त्यांनी काँग्रेसवाल्यांना डुक्कर म्हटलं, त्यामुळे त्यांची संस्कृती आणि वागणं दिसत आहे. याआधी अमरावतीमध्ये युवक काँग्रेसने त्यांची मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंद केली होती, आता अनिल बोंडे ते सिद्ध करत आहेत, त्यांच्या डोक्यात फरक पडला आहे.उल्हासनगर गोळीबार प्रकरण संदर्भात बोलताना महाराष्ट्राचे बिहार जर तुम्ही कराल तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. दुर्दैवाने आज सर्व गुंडाराज सुरू आहे. एकीकडे मुंबईच्या सर्व गोष्टी तुम्ही गुजरातकडे नेत आहात व दुसरीकडे अशा गोष्टींना तुम्ही वाव देत आहोत. त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही.महाराष्ट्रात असं कधीच झालं नाही जे आज होत आहे.
होम मिनिस्टर रिएक्शन द्यायला लवकर पुढे येत असतात, आज ते दिसत का नाही? असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.