
नागपूर- राज्यातलं सरकार लुटेरं आणि डाकू आहे. असे आम्ही अनेकदा बोललो आहे. जो कोणी आमदाराचं एकत नसेल मग आयपीएस अधिकारी किंवा कोणी असेल त्याची तात्काळ बदली करा. पोलिसांवर भयानक दबाव जो कधी नव्हे ते आता आपण बघत आहोत. पोलिसांनी कोणतेही काम करु नये, अशा पद्धतीचं दबावतंत्र गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडून सुरू आहे.लोकशाही विचाराला येड्याचं सरकार संपवण्याचं काम करत आहेत. अशा सरकारला तात्काळ बरखास्त करायला पाहिजे.
सत्तेच्या गर्मीचा हा प्रत्यय आहे, आम्ही स्वच्छ आणि रामराज्य चालवतो म्हणतात पण आता या घटनेवरून जनाची नव्हे तर मनाची लाज बाळगायला हवी. महाराष्ट्रात गुंड राज्य या सरकारने राबविले आहे.
महाविकास आघाडी वाटाघाटी बाबतीत छेडले असता ऍड प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आहेत. कालची बैठक महाविकास आघाडीची बैठक होती. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक होते, हा काय प्रकार आहे? आम्ही कोणाला बळजबरी करु शकत नाही. केंद्र सरकारचे हे शेवटचे बजेट होते. नरेंद्र मोदी सरकारला पुढचं बजेट ठेवायला मिळणार नाही. महायुतीमध्ये काय चाललं आहे? हे आ गणपत गायकवाड यांच्याकडून दिसून आले.
दुसरीकडे महाविकास आघाडीत काहीच अडचण नाही. आम्ही 48 जागा लढू आणि जिंकू असा दावा नाना पटोले यांनी केला.