राज्यात स्वबळावर सरकार, काँग्रेसचे स्वप्न! -प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निर्धार।

0

-नागपुरातील प्रदेश कार्यकारिणीत 7ठराव नागपूर : राज्यात सारेच पक्ष स्वबळावर सत्तेच्या दृष्टीने कामाला लागले असताना आता काँग्रेसचेही हेच स्वप्न आहे.

भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला, जनतेच्या प्रश्नी, जनतेशी संवाद साधणारे ‘हात से हात जोडो ‘अभियान आता 23 जानेवारीपासून सुरू होत आहे. जिल्हा ते गाव पातळीवर हे अभियान असेल. देशभरात याप्रकारचे अभियान तीन दिवस राबविल्या जाणार असून पक्षाचा ध्वज घरोघरी पोहचविला जाईल. याविषयीचा आढावा प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. याविषयीची माहिती पत्रपरिषदेत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. यासोबतच येत्या 30 जानेवारीला राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो ‘अभियानाचा समारोप काश्मिरातील श्रीनगर येथे होत आहे. यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांना चलो श्रीनगर..असे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकरी कर्जमाफी, वीजबिल माफीसोबतच केंद्र शासनाच्या निषेधासह 7 ठराव एकमताने पारित करण्यात आलेत. प्रथमच अशा प्रकारची बैठक मुंबई बाहेर झाली हे विशेष. नागपुरातील सिव्हिल लाईन्सस्थित राणी कोठी येथे झालेल्या या बैठकीला अभियान प्रभारी माजी केंद्रीय मंत्री के पल्लम राजू, विलास मुत्तेमवार,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा बाळू धानोरकर,माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, शहर अध्यक्ष आ विकास ठाकरे, जिल्हा अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी,नसीम खान,प्रणिती शिंदे,नाना गावंडे,अतुल लोंढे आदी अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष,गटनेते बाळासाहेब थोरात माजी मंत्री ऍड यशोमती ठाकूर यांच्या गैरहजेरीचीही चर्चा यानिमित्ताने रंगली.मात्र, सर्वांनी आपल्याला व्यक्तिगत कारणे सांगितल्याचे करीत इतर जे पदाधिकारी, आमदार जे बैठकांना गैरहजर राहतात, मंत्रीपदासाठी पुढे पुढे करतात अशांवर नोटीस देत कारवाई केली जाईल असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचेच यासंदर्भात सक्त आदेश असल्याचे सांगितले. भाजप जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी नवनवीन मुद्धे पुढे करीत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात एखाद्याला उध्वस्तच करायचे याच इराद्याने राजकीय दहशतवाद सुरू आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. नागपूर,अमरावती निवडणूक संदर्भात आज चर्चा झाली, महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली जाईल असेही केले. सुरजागड प्रकल्पात मोठे पोटेनशियल असताना दुर्लक्ष करण्यात येत आहे काँग्रेसचे आमदार या ठिकाणी जाणार असल्याची माहिती दिली. बॉक्ससाठी भाजपविरोधात जनतेच्या कोर्टात आरोपपत्र दरम्यान,भाजपने 2014, 2019 च्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले याचा जाब आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन मागणार आहोत, भाजपविरोधात जनतेच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार असून भाजपला याची उत्तरे द्यावीच लागतील असे पटोले यावेळी म्हणाले.