Sudha Murty :सुधा मूर्ती यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

0

 

Sudha maurti new for today news पुणे (Pune), 27 जुलै  लोकमान्य टिळक (Lokmanya Tilk) यांच्या चतु:सूत्रीतील स्वदेशीच्या अनुषंगाने मानवी व सामाजिक विकासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy)यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (टिळक स्वराज्य संघ) वतीने शनिवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.

आगामी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या 104 व्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. महाराष्ट्र सदनात सायंकाळी 6 वाजता होणार्‍या सोहळ्यात सुधा मूर्ती यांना टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार डॉ. शाहू छत्रपती महाराज, केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तसेच डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणति रोहित टिळक यांच्यासह ट्रस्टचे अन्य विश्‍वस्त यावेळी उपस्थित असतील.

स्मृतिचिन्ह आणि एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे यंदाचे 42 वे वर्ष आहे. या सोहळ्यात टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्‍वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक यांनी लिहिलेल्या ‘लिजेंडरी लोकमान्य’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होईल. लोकमान्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि दुर्मिळ छायाचित्रे याचा समावेश या कॉफीटेबल बुकमध्ये आहे.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार list
Lokmanya Tilak puraskar 2023
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार List
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024
‘राजर्षी शाहू पुरस्कार 2023′ कोणाला प्रदान करण्यात आला?
Sudha Murthy Latest Award
Sudha Murthy News
Sudha Murty education
Sudha Murthy latest book
Where is Sudha Murthy now
Sudha Murthy daughter
Sudha Murthy Global Indian award
Sudha Murty books