Nitin Gadkari सिलीगुडीतील कार्यक्रमात गडकरींना आली भोवळ

0

कोलकाता : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गुरुवार, 17 नोव्हेंबर रोजी बंगालमधील सिलीगुडी येथे मंचावर भोवळ येऊन खाली पडले. सिलीगुडी येथील एका रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी नितीन गडकरी उपस्थित होते.

हा भूमीपूजन समारंभ सुरू असतानाच नितीन गडकरी यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी सोबतच्या सहकाऱ्यांना तसे कळविलेही. आयोजकांनी लागलीच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. डॉक्टरांनी तात्काळ तपासणी केली. “गडकरी यांच्या रक्तातील साखरेच्या पॅरामीटरमध्ये अचानक घट झाल्यामुळे त्यांना भोवळ आली, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आणि उपचार देखील सुरू केले”,

घटनास्थळी उपस्थित एका भाजप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, सिलीगुडीच्या डागापूर मैदानावर एका कार्यक्रमात मंचावर असतानाच नितीन गडकरी यांची ‘शुगर लेव्हल’ कमी झाली आणि त्यांना लगेच मंचावरून हलवून त्यांना सलाईन लावण्यात आले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेची दखल घेत , पोलिस आयुक्तांना परिस्थितीकडे लक्ष देण्यास सांगितले. गडकरी यांना कार्यक्रमस्थळावरून बाहेर भाजप नेते राजू बिश्त यांच्या निवासस्थानी नेण्यात आले व तेथेच ते विश्रांती घेत असल्याचे समजते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा