

नागपूर (Nagpur), दि. 26 मे 2026: मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे उद्या, बुधवार 27 मे रोजी सिव्हील लाईन्स विभागातील क्लार्क टाऊन या वीज वाहीनीसोबतच कॉग्रेसनगर व बुटीबोरी विभागातील काही वाहिन्यांवरील वीज पुरवठा आज बाधीत राहणार आहे.
या कामांमुळे कॉग्रेसनगर विभागातील पांढराबोडी, ट्रस्ट लेआउट, देवतळे लेआउट या भागात सकाळी 7:30 ते 10:30, तर अजनी ते ऑरेंज सिटी चौक, देवनगर, सावरकरनगर, एलआयसी कॉलनी या भागात सकाळी 7 ते 10. तेलंगखेडी, मरारटोली, पीएनटी कॉलनी, कर्वे नगर, उज्वल नगर, पावन भूमी, पर्यावरण नगर, श्री राम नगर, कॉस्मोपॉलिटन, सरस्वती विहार, लोखंडे नगर, पठाण लेआउट, संभाजी नगर, भांगे लॉन, भाग्यश्री लेआउट, कॉसमॉस ताऊन, द्रोणाचार्य नगर, गोरले लेआउट या भागात सकाळी 7 ते 11 या वेळेत. सुजाता लेआउट, गांधी बिल्डर, अग्ने लेआउट, स्वावलंबी नगर, सरस्वती नगर, दिनदयाल नगर या भागात सकाळी 8 ते 11 या वेळेत. स्वागत प्राणी संग्रहालय, एश्वर्या लेआउट, शिवशक्ती लेआउट, सीजीएचएस सोसायटी, सोनेगाव या भागात सकाळी 7:30 ते 10 या वेळेत, हिरणवार लेआउट, आनंद नगरर,घरकुल परिसर या भागात सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत. गायत्री नगर, परसोडी, दत्त मंदिर, श्री नगर, हनुमान मंदिर परिसर, गोपाल नगर, नाईक लेआउट ,फायर क्वार्टर, विजय नगर. हिमाला प्रेस्टिज, शेवाळकर गार्डन, ईटीएस कॉलनी आणि आयटी पार्क या भागात सकाळी 7 ते 11 या वेळेत वीज पुरवठा खंडित राहील.
याशिवाय, सकाळी 7 ते 11 या वेळेत सिव्हील लाईन्स विभागातील सिंधी कॉलनी, कडबी चौक, क्रिश्चन कॉलनी, लुंबिनी नगर आणि क्लार्क टाऊन परिसरातील वीजपुरवठा बंद राहील तर
बुटीबोरी विभागात सकाळी 9 वाजेपासून करमतारा, सूर्यकिरण, हिंदुस्तान, जयस्वाल निको, कॅडेलरिस, रुची सोया, इन्व्हेंटरी आणि प्रीमियर इरिगेशन या औद्योगिक ग्राहकांचा तर दुपारी 1 ते 2:30 या वेळेत ए-झोन फेज २, एसझेड-झोन आणि एसएझेड फूड या भागातील वीज पुरवठा बाधीत राहील
या काळात नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली आहे. तरी नागरिकांनी वीज बंद होण्यापूर्वी आपली महत्त्वाची घरगुती व व्यावसायिक कामे आटपून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
















