
चंद्रपूर (Chandrapur)– राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे २० फेब्रुवारी २०२५ ला ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी राज्यभरात धरणे आंदोलन होणार आहे. धरणे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज 16 फेब्रुवारीला वरोरा नाका येथील पत्रकार भवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसी, व्हीजे,एनटी & विमाप्र विद्यार्थ्याना अजूनही आधार योजनेतील रक्कम मिळाली नाही यासह जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी साठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे,जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मागासवर्गीयाचे आरक्षण लागू करण्यात यावे,सारथी व बार्टी प्रमाणे दि.२३ सप्टेंबर २०२४ च्या मंत्री मंडळ निर्णयाप्रमाणे महाज्योती अंतर्गत नोंदणी असणाऱ्या ओबीसी, भटके विमुक्त व एस.बी.सी विद्यार्थी यांना २ वर्षांपासून प्रलंबित असणारी फेलोशिप तात्काळ अदा करावी.क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा 15लक्ष रुपये करण्यात याव, आरक्षणाची 50% मर्यादा रद्द करण्यात यावी ,ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा इत्यादी प्रलंबित मागण्या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर चंद्रपूर येथे धरणे आंदोलन करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, तसेच राष्ट्रीय ओबिसी महासंघाच्या सर्व कक्षाचे प्रमुख व समविचारी संघटना ओबीसी समाजात मोडणाऱ्या जातीय संघटना, विध्यार्थी यांची सभा आज 16 फेब्रुवारी 2025 ला रविवार ला दुपारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ, वरोरा नाका,चंद्रपूर,येथे पार पडली.
यात प्रामुख्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व विंगच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला उपस्थित दर्शविली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सचिव सचिन राजूरकर यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या आजच्या बैठकीत 20 तारखेला होणाऱ्या धरणे आंदोलनाचे नियोजन करण्यात आले असून.या आढावा बैठकीला सचिन राजुकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ, श्याम लेडे प्रदेश अध्यक्ष कर्मचारी महासंघ , दिनेश चोखारे प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, माजी नगरसेवक पप्पू देशमुख,रंजित डवरे किसान महासंघ जिल्हा अध्यक्ष, भावना बावनकर जिल्हा अध्यक्ष महिला महासंघ, मनीषा बोबडे जिल्हा महासचिव, देवराव दिवसे जिल्हा अध्यक्ष कर्मचारी महासंघ, रवींद्र टोंगे ओबीसी योद्धा, प्रा रवि वरारकर यांची उपस्थिती होती.
संचलन प्रदीप पावडे यांनी केले तर आभारप्रदर्शन कालिदास येरगुडे यांनी केले
जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी 20 फेब्रुवारी 2025 ला होणाऱ्या राज्यव्यापी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवानह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी केले आहे.