
NAGPUR नागपूर : राष्ट्रीय ओबीसी OBC महासंघाचे अध्यक्ष व विदर्भातील ओबीसी नेते बबनराव तायवाडे Babanrao Taiwade यांनी शनिवारी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. सरकारने ओबीसींना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. ७ डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. त्याच धर्तीवर ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा करावी, अशी मागणी तायवाडे यांनी केली आहे. ओबीसींच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करू, असे आश्वासन २९ सप्टेंबरला शासनाने दिले होते. त्याची पूर्तता झाली नाही, याकडेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यात आले.
Related posts:
नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य चित्रकला स्पर्धा!
May 30, 2026MAHARASHTRA
नागपूरकरांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला मिळणार चालना? मुरलीधर मोहोळ यांचे संकेत
May 29, 2026Artical Blog
शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा राज्य सरकारचा डाव हाणून पाडू काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार...
May 29, 2026Artical Blog
















