गणतंत्रदिनाच्या निमित्ताने राज्यातील ७४ पोलिसांना विविद पोलिस पदके जाहीर

0

मुंबई : गणतंत्रदिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना विविध पदके जाहीर झाली (President’s Police Medal) आहेत. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांना तसेच इतर तीन अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. राज्यातील 31 पोलिसांना शौर्यपदक तर 39 जणांना ‘पोलीस पदक’ जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेल्या इतर पोलिस अधिकाऱ्यांमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबई पोलिस दलातील पोलीस उपनिरीक्षक संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा प्रामुख्याने समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत घोषणा केली आहे. गणतंत्रदिनाच्या आदल्या दिवशी पोलिस व संरक्षण दलातील अधिकाऱ्यांना सन्मान पदके जाहीर होत असतात. देशातील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदके जाहीर झाली असून त्यापैकी 140 जणांना पोलिस शौर्य पदक, 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (Police Medal for Meritorious Service) जाहीर झाले आहे. 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात कार्य करणाऱ्या 80 कर्मचार्‍यांना जाहीर झाले आहेत. दरवर्षी गणतंत्रदिनाच्या आदल्या दिवशी ही पदके जाहीर होत असतात.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा