Home MAHARASHTRA अवयवदान : जीवनानंतरही जीवन देणारी मानवतेची शपथ

अवयवदान : जीवनानंतरही जीवन देणारी मानवतेची शपथ

0

चंद्रपूर : १८ डिसेंबर रोजी विठाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते महेश काहीलकर सर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्शवत असा निर्णय घेतला. त्यांनी स्वतः आपल्या विभागात उपस्थित राहून अवयवदानाची शपथ घेतली तसेच अधिकृत अवयवदान नोंदणी करून समाजासमोर मानवतेचा उत्तम आदर्श ठेवला.

महेश काहीलकर सरांच्या या उपक्रमामुळे अवयवदानासारख्या संवेदनशील विषयाबाबत समाजात जनजागृती निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. जीवनानंतरही दुसऱ्यांचे जीवन वाचवता येते, हा संदेश त्यांच्या कृतीतून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला आहे.

या प्रसंगी जन औषध वेदकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. निवृत्ती जीवने सर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. शीतल ढोबळे मॅडम, डॉ. देवश्री आत्राम मॅडम तसेच डॉ. शुभम ठाकरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी अवयवदानाचे महत्त्व, त्याचे सामाजिक व वैद्यकीय फायदे याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक गणेश तुप्पेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

महेश काहीलकर सरांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन अवयवदानाची शपथ घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.