अमरावती: जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ (Increase in incidents of violence against women) होताना दिसून येत आहे. तरुणी, युवतींना छळण्याच्या घटना अधिक आहेत. अगदी अल्पवयीन मुलीसुद्धा सुरक्षित नसल्याचे नोंदविल्या जाणाऱ्या घटनांवरून लक्षात येते. शहरासह ग्रामीण भागातही अल्पवयीन मुलींचा पाठलाग, विनयभंग, छेड काढणे, अपहरण, बलात्कार करणे, अशा घटना नियमित पुढे येत आहेत. विशेष म्हणजे आरोपींना कठोर शिक्षा ठोठावली जात असतानाही त्याची कोणतीही भीती आरोपींवर दिसत नाही. हे अधिक चिंताजनक आहे. शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. त्यापाठोपात बारावीची परीक्षा देत असलेल्या अल्पवयीन तरुणीला धमकावीत (threatened) थेट बलात्काराचाच इशारा देण्यात आल्याची घटना चांदूर रेल्वे (Chandur Railway) शहरात समोर आली आहे. याप्रकरणी, चांदुररेल्वे पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
कुणाल गजानन वानखडे (२१) रा. कळमगाव, ता. चांदूररेल्वे असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध माथेफिरूविरूध्द विनयभंग व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार १७ वर्षीय पीडिता सोमवारी दुपारी २ च्या सुमारास बारावीचा पेपर देण्याकरीता परिक्षा केंद्राकडे जात होती. तेवढ्यात आरोपी दुचाकीस्वार कुणालने तिला कट मारला. तिच्यासोबत असभ्य वर्तण केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने तू कॉलेजच्या बाहेर ये, तुला सोडणार नाही, मारून टाकतो, असा गर्भित धमकी दिली. त्या धमकीमुळे सैरभैर झालेल्या विद्यार्थीनीने कसाबसा पेपर दिला. अगदी घाईने घर गाठले. सारा प्रकार पालकांच्या कानी घातला. रात्रीच्या सुमारास तिेने चांदूर रेल्वे पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
महिलेवर अतिप्रसंग
जिल्ह्यातील अन्य एका घटनेत एका ४५ वर्षीय महिलेला विवस्त्र करण्याचा संतापजनक प्रकार चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात समोर आला आहे. १२ मार्च रोजी रात्री पीडित महिला स्वत:च्या शेतात पाणी व्यवस्थापनाचे काम करीत होती. तेवढयात आरोपी देशमुख तिथे पोहोचला. तू पाण्याचे काम करू नकोस, असे म्हणून त्याने तिला शिविगाळ करीत विनयभंग केला.