Pakisthan railway accident
कराची, 6 ऑगस्ट, कराचीहून रावळपिंडी येथे जाणा-या हजारा एक्सप्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला. तर ८० जण जखमी झाले आहेत. ही घटना शहजापूर आणि नवाबशाह दरम्यान असलेल्या सहारा रेल्वे स्थानकाजवळ घडली. अपघात मोठ्या स्वरुपाचा असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना नवाबशाह मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात घडला त्यावेळी ट्रेन कराचीहून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जात होती.
दरम्यान दुर्घटनाग्रस्त डब्यांतून प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.त सेच दुर्घटनाग्रस्त ठिकाणाच्या जवळपासच्या रुग्णालयात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मदत कार्यात अडथळा येवू नये यासाठी अप मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
यापुर्वी ही रेल्वे अपघातातून बचावली असल्याचे सांगण्यात येत आहे.