नवी दिल्ली : SC सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यावर आता Congress leader Rahul Gandhi काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व आज पुन्हा बहाल करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाच्या सोमवारी सकाळी पार पडलेल्या बैठकीत यासंदर्भात अधिसूचना काढण्याचा निर्णय झाला व त्यानंतर ती जारीही करण्यात आली. काँग्रेसने न्यायालयाच्या निकालाची प्रत व अन्य कागदपत्र लोकसभा सचिवालयाकडे पाठविले होते, हे विशेष. खासदारकी पुन्हा बहाल झाल्याने राहुल गांधी यांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनात सहभागी होता येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. दरम्यान, उद्या मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. २०१४ नंतर मोदी सरकारच्या विरोधातील हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे. खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी या चर्चेत राहुल गांधी सहभागी होणार आहेत. मागच्या प्रस्तावाच्या वेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना मारलेली मिठी चांगलीच गाजली होती.