
गडचिरोली GADCHIROLI : गडचिरोली जिल्ह्यात Surjagad Iron Project सुरजागड लोह प्रकल्पाच्या खाणीत रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात अभियंत्यासह एकूण तिघा जणांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. सूरजागड पहाडीवर उत्खनन करणारे वाहन पहाडीवरून खाली On the Mahindra Camper महिंद्रा कॅम्परवर कोसळले. त्यामुळे या महिंद्रा कॅम्परमधील पाच जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या तिघांपैकी एक जण इंजिनीअर आहे. अभियंत्याचे नाव सोनल रामगीरवार (वय २६ ) असे असून ते अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील रहिवासी आहेत. या घटनेनंतर प्रकल्पाच्या परिसराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून लोह उत्खनन सुरु आहे. यासाठी वाहने पहाडीवर पाठवली जातात. त्यापैकी एक वाहन खाली कोसळले व ते खाली उभ्या असलेल्या महिंद्रा कँपर जीपवर आदळले. तेथेउभे असलेले अभियंता सोनल रामगीरवार आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर तिघांनाही तातडीने अहेरी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर सूरजागड परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढविली असून लोकांना शांतता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सूरजागड प्रकल्पाला नक्षलवाद्यांचा तीव्र विरोध आहे. हा विरोध झुगारून खाण प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पाच्या विरोधात नक्षलवाद्यांच्या कायम कारवाया सुरु असतात.