(Mumbai)मुंबई-”१९९६ साली (Congress)काँग्रेसने देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढल्यावर आय.के. गुजराल यांच्याऐवजी शरद पवार यांनाच पंतप्रधानपदाची संधी होती. त्यावेळी पवारांसाठी पोषक वातावरण होते. शरद पवार हे त्यावेळी ठाम राहिले असते तर त्यांना देवेगौडा यांच्यानंतर पंतप्रधान होण्याची संधी मिळाली असती. ही खंत माझ्यासह पवारांना देखील आहे”, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी एका वाहिनीशी बोलताना (NCP Working President Praful Patel on Sharad Pawar) मांडले.
( Sitaram Kesari)“काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांनी १९९६ मध्ये तत्कालीन देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढल्यावर पवारांना पंतप्रधानपदाची संधी होती. सर्वजण त्यांच्या पाठिशी होते. काँग्रेस पक्षात त्यांच्यासाठी पोषक वातावरण होते. तेव्हा स्वतः पवार हे ठाम राहिले असते तर इंदरकुमार गुजराल यांच्याऐवजी पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते”, असा दावा पटेलांनी केला.
“तेव्हा आम्ही कुठेतरी कमी पडलो होतो. अकरा महिन्यातच सीताराम केसरी यांनी यांनी देवेगौडा यांचा पाठिंबा काढला. त्यावेळी काँग्रेसची परिस्थिती फार चांगली नव्हती. काँग्रेसकडे १४५ खासदार होते. शरद पवार हे संसदीय पक्षाचे नेते होते. अकरा महिन्यानंतर होणारी निवडणूक कोणत्याही खासदाराला परवडणारी नव्हती. सीताराम केसरी यांनी स्वतःच्या पंतप्रधानपदाच्या लालसेने पाठिंबा काढला पण स्थिती पवारांसाठी अनुकूल होती” असे ही पटेल म्हणाले.