AJIT PAWAR SANJAY RAUT पवार, राऊतात वाकयुद्धच

0

मुंबई (mumbai)  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील शीतयुद्धाला आता वाकयुद्धाचे स्वरुप आले (Cold war between Ajit Pawar and Sanjay Raut intensifies) आहे. भाजपसोबत जाण्याच्या मुद्यावर स्पष्टीकरण देताना पवारांनी संजय राऊतांना फटकार लगावली होती. त्यामुळे नाराज झालेल्या संजय राऊतांनी देखील आज अजित पवारांवर पलटवार केला. “मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे ऐकतो. इतर कुणी माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेत असेल तर त्याला उत्तर देण्यास मी बांधील नाही..” असे संजय राऊत म्हणाले. “शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही आमची वकिली करत होतात. आता मी मविआची वकिली केली म्हणून माझ्यावर खापर का फोडत आहात?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“अजितदादांनीच भाजपचा काय डाव आहे?, हे स्पष्ट करुन सांगावे”, असे आव्हानही राऊतांनी यावेळी दिले आहे.

मी बोलत राहणार-राऊत

दरम्यान, सामनातील रोखठोक सदरात मी चुकीचे लिहिलेले नाही. विरोधी पक्षाच्या आमदारांवर दबाव टाकला जात असल्याचे स्वतः शरद पवार सांगत आहेत. त्यांनी पंतप्रधान, गृहमंत्र्यांना पत्र देखील दिले आहे. तेच मी सामनामध्ये लिहिले तर चुकीचे काय? मी शरद पवारांचे ऐकतो. इतर कुणी माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेत असेल तर त्याला उत्तर देण्यास मी बांधील नाही. मी यापुढेही लिहित राहणार, बोलत राहणार, कोणाला टोचत असेल तर मी काय करू? असेही राऊत म्हणाले. मी मविआचा चौकीदार असल्याचेही राऊत म्हणाले.

काय म्हणाले अजितदादा?

 

“इतर पक्षाच्या प्रवक्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसची वकिली करू नये”, अशा शब्दांत काल अजित पवारांनी संजय राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केली होती.