गुलाबी वादळ’ नागपुरात, राज्यातले पहिले बीआरएस कार्यालय सुरू

0

नागपूर : अब की बार किसान की सरकार… नारा देत देशाचे नेतृत्व करण्याच्या महत्वाकांक्षेपोटी राज्यात आलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे आज नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले. नांदेडच्या जाहीर सभेनंतर आज राज्यातील पहिल्या कार्यालयाचे उदघाटन झाल्यानंतर संघ कार्यालय रेशीमबाग शेजारी असलेल्या सुरेश भट सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यासाठी केसीआर पोहचले. दुपारी दोनचा हा कार्यक्रम सुमारे तीन तास उशिराने सुरू झाला. 24 तास मोफत वीज, पाणी हे तेलंगणा मॉडेल राज्यात स्वीकारण्याचे आव्हान त्यांनी भाजप सरकारला दिले. आता शेतकरी आत्महत्या नको,अब की बार केसीआर सरकार,किसान सरकार अशा घोषणा देत हजारो नागरिक विदर्भ, तेलांगणातून नागपुरात यानिमित्ताने आले होते. रेशीमबाग मैदानावर वाहनांची गर्दी झाली होती.महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बीआरएसने प्रचाराचा धडाका १ जून पासून सुरू केला आहे. पूर्व विदर्भाची समनव्याची जबाबदारी प्रा ज्ञानेश्वर वाकुडकर यांच्याकडे देण्यात आली असून तेलंगणाचे नेते आमदार बालका सुमन यांच्या देखरेखीखाली संपूर्ण कार्यक्रम होत आहेत. बी .आर. एस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड ,माजी आमदार दीपक आत्राम माजी आमदार राजू तोडसाम ,माजी आमदार वसंतराव बोंडे ,माजी आमदार चरण वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र समन्वय निखिल देशमुख , नानाभाऊ गाडबैले,, प्रणिताताई उके, रेश्माताई चव्हाण, आनंदराव अंगलवार, जावेद हबीब, संजय बोरकर , मतीन तमन्ना , शिलानंद कांबळे, तुषार भगत, धनंजय काकडे, आणि धनंजय वानखेडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.