गांधीनगर, 16 जून : अरबी समुद्रात 10 दिवसांपूर्वी निर्माण झालेले Cyclone Biperjoy बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी Gujrat गुजरातच्या कच्छमधील जाखाऊ बंदरावर धडकले. राज्यात चक्रीवादळामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत.
गुजरातच्या अनेक जिल्ह्यांमध्ये बिपरजॉयमुळे जोरदार वारे वाहत असून पाऊस पडत आहे. कच्छ आणि सौराष्ट्रच्या किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जखाऊ आणि मांडवी येथे अनेक झाडे, होर्डिंग्ज आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. भावनगर जिल्ह्यात पुराच्या दरीत अडकलेल्या शेळ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. त्याचवेळी देवभूमी द्वारका येथे झाडे पडल्याने 3 जण जखमी झाले आहेत. बिपरजॉय वादळाचा प्रभाव गुजरातच्या अनेक भागात दिसून आला आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. वादळामुळे अनेक झाडे व खांब उन्मळून पडले आहेत. अनेक भागातील दिवे बंद झाले आहेत. दरम्यान वादळ सध्या 13-14 किमी वेगाने पुढे सरकत आहे. वादळामुळे आज, शुक्रवारी कच्छ, द्वारका आणि जामनगरमध्येही जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.