शिर्डी shirdi : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री deepak kesarkar दीपक केसरकर यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना ऑफर दिली आहे. अजित पवार हे कार्यक्षम नेते असून त्यांनी आमच्यासोबत यावे, अशी ऑफर shinde group शिंदे गटाचे मंत्री असलेल्या केसरकरांनी दिली आहे. ही ऑफर देताना केसरकर म्हणाले की, राष्ट्रवादीत त्यांच्याबाबत काय होत आहे, याची साऱ्यांनाच कल्पना आहे. राज्यात दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर त्यांनी सावध भूमिका घेतली. ajit parar अजित पवार हे जबाबदार नेते असून त्यांनी अशी वक्तव्ये करू नये, असे केसरकर म्हणाले. (Education Minister Deepak Kesarkar on Ajit Pawar)
केसरकर म्हणाले, खासदार संजय राऊत यांच्यासारखी लोकं रोज बोलतात. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र, अजित पवार बोलतात, ते गांभीर्याने घेतले जाते. सामाजिक ऐक्य राखण्यासाठी अजित पवार हे आमच्यासोबत आघाडीवर असतील, असा विश्वास असल्याचे केसरकर म्हणाले. दादांनी सरकारमध्ये यावे, ही आमची अपेक्षा आहे. दादा हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. केंद्रामध्ये आम्हाला निश्चितपणे मंत्रीपद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला