विजयवाडा (Vijaywada) : पोलिस ठाण्यात कुठल्या तक्रारी येतील, याचा नेम राहिलेला नाही. अशातच राजकारणासाठी पोलिस तक्रारींचा बराच वापर होतो. अशाच किस्सा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे घडला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी विरोधी पक्ष तेलुगु देशमच्या महिलांनी (street dog) भटक्या कुत्र्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार (Police Complaint against Dog) दाखल केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी मात्र अद्याप या तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली नाही. तेलुगु देशमच्या नेत्या दसारी उदयश्री यांनी विजयवाडा पोलिसांकडे तक्रार करून कुत्र्यावर कारवाईची मागणी केली होती. या घटनेची सुरुवात एका व्हायरल व्हिडिओतून सुरु झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओमध्ये एक मोकाट कुत्रा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचे भिंतीवर लावलेले पोस्टर पंजाने फाडताना दिसत आहे. ही घटना विजयवाडा शहरातील असल्याचे सांगितले जाते. विरोधी पक्ष तेलुगु देशमच्या नेत्या दसारी उदयश्री यांनी या व्हिडिओची दखल घेऊन कुत्र्याच्या विरोधात थेट तक्रार दाखल केली. त्यांनी काही महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पोलिस ठाणे गाठले. त्यांनी तक्रारीत नमूद केले की, व्हायरल व्हिडिओत कुत्रा आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडत आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस पक्ष राज्यात बहुमत मिळवून सत्तेवर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडून कुत्र्याने राज्यातील सहा कोटी जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे कुत्र्यावर कारवाईची आमची मागणी आहे. पोलिसांनी या तक्रारीची अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही. दरम्यान, ही तक्रार मुख्यमंत्र्यांचा उपहास करण्यासाठी करण्यात आल्याचा वायएसआर काँग्रेसचा आरोप आहे. (i hate jagan)