(Mumbai)मुंबई : ज्येष्ठ पुरोगामी लेखक आणि विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरसे (Vice President of Samata Parishad Prof. Hari Narke)यांचे बुधवारी निधन झाले आहे. वयाच्या ६० व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला (Hari Narke Passed Away). मुंबईतील एशिअन हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मागील वर्षभरापासून ते आजारी होते. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात १५-२० दिवस दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एक-दोन महिन्यापूर्वी राजकोट येथील रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांची प्रकृती स्थिर झाली होती, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
बुधवारी ते मुंबईला येत असताना प्रवासात सकाळी सहा वाजताच गाडीत त्यांना उलट्यांचा त्रास झाल्याने एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती (Chhagan Bhujbal)छगन भुजबळ यांनी दिली. प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, हे त्यांचे पुस्तके प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग लिहित होते. सोशल मीडियावर ते सतत सक्रीय होते. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला व त्याचे संपादक हरी नरके होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 26 खंड प्रकाशित केले व त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते. ( Pune University)पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील होते.